मनुष्य केवळ भाकारीमुळे जगत नाही 

परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करिते; परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांस समंजस करितो. परमेश्वराचे विधि सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात; परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुध्द आहे,ते सर्वकाळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथेव  न्याय आहेत. ते सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत, ते मधापेक्षा, मोहळातून  पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत.

शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो; ते पाळील्याने मोठी फलप्राप्ती होते. (स्तोत्रसंहिता 19:7–11)

जरी मनुष्याजवळ जे काही त्याला पाहिजे ते असले, तरी अजूनही त्याच्या हृदयात खालीपणा आहे. मनुष्ये स्वतःला मनोरंजन, मित्रता, इत्यादीमध्ये व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु हा खालीपणा केवळ देव जो आपला निर्माणकरता त्याच्यासोबत असणाऱ्या नात्याद्वारेच भरून काढता येवू शकेल.

आपल्याला पवित्रशास्त्रात पाहण्यास मिळते कि जे विश्वासणारे होते, ते देवामुळे आणि त्याच्या वचनामुळे आनंदाने परिपूर्ण झाले होते. हा आनंद सर्वकाळ टिकणारा आहे, आणि तो नाहीसा होणार नाही, आणि जो कि कोणीही आपल्यापासुन  हिराऊन घेवू शकत नाही.

खरी भाकर

पुष्कळ लोक पृथ्वीवरील गोष्टिंवर मन लावतात. ज्या कि सर्वकाळ टिकणाऱ्या नाहीत. परंतु येशूने म्हटले…

मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखांतून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल,’ असा शास्त्रलेख आहे.’ (मत्तय 4:4)

आपण दिवसातून तीन वेळा जेवण करण्यास विसरत नाही. जसे अन्न आपल्या शारीरिक वाढीसाठी गरजेचे आहे, तसेच देवाचे वचन आपल्या आत्मीकवाढीसाठी गरजेचे आहे. मनुष्य केवळ शरीराचा बनलेला नाही पण त्याला आत्माही आहे. आपला आत्मा हा सार्वकालिक आणि अदृश्य आहे. म्हणूनच आपल्याला त्याची खुप काळजी घेणे गरजेचे आहे.

 देवावरील प्रेम

 सर्वात मोठी आज्ञा देवाने मनुष्याला दिली ती ही की, त्याच्यावर मनुष्याने प्रेम करावे :

हे इस्रायला  श्रवण  कर; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे; तू  आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने,पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या ह्र्दयात ठसव; आणि तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्यांविषयी बोलत जा. (अनुवाद 6:4–7)

देवावर प्रेम करणे आणि बायबल वाचणे हे अगदी खोलवर जुडलेले आहे. जर आपण खरोखरच देवावर प्रेम करत असलो तर, आपणास देवाला त्याच्या वचनाद्वारे जाणून घेण्याची इच्छा असेल. जर आपण बायबल वाचण्यासाठी वेळ घेत नाही आणि त्याच्या  वचनाप्रमाणे जगत नाही  तर हे आपल्या देवावर असणाऱ्या प्रेमाची कमतरता दाखवते. येशुनेही ह्याविषयी सांगितले कि …

ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील. (योहान 14:23)

लाजराची बहिण मरियाने तिचे देवावरील जे प्रेम होते ते योग्य गोष्टींना प्रधान्यता देऊन तिने व्यक्त केले. तिने येशूचे वचन ऐकण्याचे निवडले आणि त्याने त्याबद्दल तिची प्रशंसा केली:

मग ते पुढे जात असता तो एका गावात आला; तेव्हा मार्था नावाच्या  एका  स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती; ती प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऎकत राहिली. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येवून म्हणाली, प्रभुजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, ह्याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य  करावयास तिला सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे, मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस; परंतु थोडक्याच गोष्टींचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे; मरीयेने चांगला वाटा  निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.(लुक 10:38–42)

देवाचे वचन प्रकाश आहे

आपल्या पूर्वीच्या पापांमुळे आणि पुष्कळ चुकीच्या निर्णयांनी आपल्या जीवनांची हानी झाली आहे. हि जी हानी झाली आहे त्याची भरपाई फक्त देवाकडे वळून त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगने यानेच होऊ शकते. जर आपण देवाच्या वचनांचा प्रकाश स्वीकार करत नाही तर अंधारात म्हणजेच पापांत चालण्यात आपला शेवट होइल. कारण देवाचे वचन आपल्या दररोजच्या जीवनात मार्गदर्शक आहे, जेणेकरून आपण पवित्र जीवन जगु  शकतो. जुन्या करारातील विशावासणाऱ्याणींही  देवाच्या वचनाद्वारे मिळणाऱ्या शक्तीचा अनुभव केला.

तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राख्ण्याने. (स्तोत्रसंहिता 119:105 )

देवाच्या वचनाद्वारे शुद्धीकरण

जर कोणी खुल्या मनाने बायबल वाचेल त्याचा सामना पवित्र देवाशी होईल, आणि त्याच्या पवित्रतेच्या प्रकाशात मनुष्याचा त्याचा आपल्या अशक्तपणा आणि पापांशी सामना होईल :

कारण देवाचे वचन सजीव, सक्रीय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव आत्मा, सांधे मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीहि निर्मिती नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे प्रगट केलेले आहे. (इब्रीकरांस पत्र 4:12–13)

देवाच्या वचनाद्वारे होणारे पवित्रकरण, आपल्याला देवासोबत होणाऱ्या भेटीसाठी तयार करते. म्हणूनच आपण देवाच्या स्तराप्रमाणे जीवन जगणे जरुरी आहे, ह्या सत्याच्या आधारावरच शेवटच्या दिवशी आपला न्याय होईल.

आपल्याला पापांपासून शुद्ध करण्यास देवाचे वचन शक्तिशाली आहे.

तू त्यांना सत्यात समर्पित कर. तुझे वचन हेच सत्य आहे. (योहान 17:17)

मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेविले आहे. (स्तोत्रसंहिता 119:11)

निर्दंभ बंधुप्रेमासाठी तुम्ही आपले जीव सत्याच्या पालनाने शुद्ध करून घेतले आहेत म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा; कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे, तर अविनाशी बीजापासून म्हणजेदेवाच्या जिवंत टिकणाऱ्याशब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. कारणसर्व मानवजाति गवतासारखी आहे; आणि तिचे सर्व गौरव गवताच्या फुलासारखा  आहे. गवत वाळते त्याचे फूल गळते; परंतु प्रभूचेवचन सर्वकाळ टिकते’. सुवार्तेचे जे वचन तुम्हाला सांगण्यात आलेते हेच होय. (पेत्राचे पहिले पत्र 1:22–25)

 इथे देवाचे सार्वकालीक वचन आणि नष्ट होणाऱ्या गोष्टी ह्यांची तुलना केली आहे.

देवाचे वचन कशाप्रकारे वाचले पाहीजे

पुष्कळजण बायबल वाचतात खरे,पण एखाद्या रीतिरिवाजाप्रमाणे दर दिवशी  एक अध्याय वाचतात. ह्या अशा रीतिरिवाजाप्रमाणे बायबल वाचण्यामुळे त्याचा जो हेतू आहे त्याकडे ते दुर्लक्ष करतात. जसे आपण प्रार्थनेद्वारे देवासोबत बोलतो त्याप्रकारेच देव त्याच्या मुलांशी बोलु इच्छीतो. बायबलमधील देवाचे वचन कधी न बदलणारे आहे. जर आपले कान उघडे असले आणि हृद्य प्रामाणिक असेल तर त्याचे वचन वेगवेगळ्या परिस्थितीत आपल्याशी बोलू शकते.

आपण बायबल सवयीमुळे किंवा माहिती गोळा करण्यासाठी वाचु नये. तर एक प्रामाणिक आणि देवासोबत खोलवर नाते ठेवण्यासाठी जीवन जगावे ह्यासाठी वाचावे.

“शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभुजी आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.” (योहान 6:68)

पूर्वी आमच्यातील काही जणांनीही अशाच चुकीच्याप्रकारे बायबल वाचले. जेव्हा आम्ही एकमेकांना भेटलो तेव्हा योग्यप्रकारे बायबल कशाप्रकारे वाचले पाहीजे हे आम्हाला समजले. आम्हीही तुम्हाला सोबत बायबल वाचण्यास आणि त्याविषयी बोलण्यासाठी आमंत्रीत करतो.

  देवाचे वचन आपल्या जीवनात लागु करणे

बायबल वाचणे हे जसे काय येशूचे वचन  ऐकण्यासारखे आहे. पण फक्त ऐकणे पुरेसे नाही तर त्याचे लागुकरण आपल्या जीवनात करणे हे हि महत्वाचे आहे.

जसे येशूने म्हटले कि,

मला ‘प्रभूजी, प्रभूजी’असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. …ह्यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे  वागतो तो कोणा एका सुज्ञ  मनुष्यासारखा ठरेल; त्याने आपले घर खडकावर बांधले. (मत्तय 7:21–27)

वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका; अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. (याकोब 1:22)

पुष्कळ लोक म्हणतात की आपण सत्याला जाणू शकत नाही किंवा प्रत्येक जणाचे  स्वतःचे एक सत्य आहे. परंतु येशुद्वारे आणि त्याच्या वचनाद्वारे आपण जे एकच सत्य आहे ते जाणून घेऊ  शकतो. आणि केवळ ह्या सत्यामध्येच आपल्याला पापांपासून मुक्त करण्याची शक्ती आहे:

येशु म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा; तुम्हाला सत्य समजेल सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. (योहान 8:31–32)

तुझ्या न्याय निर्णयांसाठी मी दिवसातून सात वेळा तुझे स्तवन करतो.
(
स्तोत्रसंहिता 119:164)

Scroll to top ↑